khasta kachori

  साहित्य :-
पाव किलो मैदा

दोन चमचे तेल

अर्धा चमचा मीठ

अर्धी वाटी मूग डाल

एक चमचा धणे पावडर

एक चमचा जिरे पावडर

एक चमचा गरम मसाला पावडर

एक चमचा बडीशेप

एक चमचा आमचूर पावडर

अर्धा चमचा ओवा

पाव चमचा हिंग


कृती :-
प्रथम मैदा, तेल ,मीठ आणि

पाणी घालून पीठ मळून घ्या

मूग डाल तव्यावर भाजून घ्या

जिरे धणे बडीशेप ही भाजून घ्या

मिक्सरला जाडसर दळून घ्या

त्यात आमचूर पावडर,हिंग,ओवा,

गरम मसाला पावडर आणि चिमूटभर मीठ

घालून थोड्स तेल घालून मिसळून घ्या

मैद्याच्या पिठाचे दहा बारा गोळे करून घ्या

बनवलेले एक चमचा सारण मोदकासारखे

भरून बंद करून घ्या वा हलके दाबून चपटे करा

तेलात किंवा वनस्पती तूपात तळून घ्या

मस्त खास्ता कचोरी तयार !!

कचोरीला मधे फोडून त्यात

दही,खजुराची चटणी, पुदिना चटणी,

शेव ,तळलेली चना डाल ,कोथिंबीर

घालून खायला द्या कचोरी चाट तयार !!

Comments

Popular Posts