काश्मिरी चिल्ली आलू !!



साहित्य :-
छोटे बटाटे ८-९ उकडून सोललेले
काश्मिरी मिरची पावडर एक/ दोन चमचा
गरम मसाला पावडर एक चमचा
धने जिरे पावडर एक चमचा
आमचूर पावडर दोन चमचा
सुंठ बडीशेप पावडर एक चमचा
ओवा अर्धा चमचा
जिरे एक चमचा
मीठ एक चमचा
कोथिम्बिर
कढीपत्ता ७-८ पाने
दही चार चमचे
एक चीज क्यूब खिसलेले







कृती :-
बटाटे अक्खे तेलातून लालसर तळून घ्या
त्याला काट्या चमच्याने सर्व बाजूनी टोचून घ्या
दही ,गरम मसाला ,एक चमचा लाल मिरची पावडर लावून,
मीठ ,सुंठ बडीशेप पावडर लावून दहा मिनिट ठेवून द्या
तेल फोडणीला घालून जिरे ,कढीपत्ता तडकावून घ्या
त्यात बटाटे परतून त्यात धने जिरे पावडर
,मीठ आमचूर पावडर ,ओवा ,काश्मिरी मिरची पावडर
उरलेले घालून दही घालून परतून घ्या
जास्त तिखट हवे असेल तर एक
चमचा मिरची पावडर अजून घाला
कोथिम्बिर व चीज खिसुन घालून सजवा !!

Comments

Popular Posts