सोयाबीन कटलेट!!!!!!!!!!!!!!!!!!
साहित्य :
- अर्धा कप सोया ग्रनुअल्स
- अर्धा कप उकडलेले मुग
- एक उकडलेला बटाटा
- पाव कप बारीक चिरलेला कांदा
- एक टी स्पून गरम मसाला
- बारीक चिरलेली कोथिंबीर
- चवीनुसार बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि मीठ
- थोडा रवा
- तेल
कृती :
- सोया ग्रनुअल्स शिजवून घेऊन त्यातले पाणी काढून टाका. बटाटा चांगला मॅश करून घ्या.
- एका पसरट भांड्यामध्ये सोया ग्रनुअल्स, मुग, बटाटा, कांदा, गरम मसाला, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या आणि मीठ टाकून चांगले मिक्स करून घ्या.
- एका बाजूला नॉन स्टिक तवा गरम करायला ठेवा. तयार केलेल्या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून दाबून त्यांना कटलेट चा आकार द्या.
- एका प्लेट मध्ये रवा पसरवा. त्या रव्यावर कटलेट ठेवून कटलेट दाबा म्हणजे रवा कटलेट ला चांगला लागेल. हा रवा कटलेट च्या दोनही बाजूना लावा.
- गरम झालेल्या तव्यावर तेल टाकून हे कटलेट त्यावर दोनही बाजूने तांबूस होईपर्यंत भाजा.
- हे गरमागरम कट्लेट कुठल्याही सॉस किंवा चटणी बरोबर खायला द्या.
Comments
Post a Comment