कस्टर्ड फ़्रुट स्यालाड !!
कस्टर्ड फ़्रुट स्यालाड !!!!!!!!! |
साहित्य :-
पावूण लिटर दूध
चार चमचे कस्टर्ड पावडर व्हनिला
साखर एक वाटी
केळी दोन / चार तुकडे करून
सफरचंद एक तुकडे करून
द्राक्ष पाव किलो
चार चिक्कू तुकडे करून
डाळींब दाने अर्धी वाटी
खरबूज एक वाटी तुकडे करून
अननस एक वाटी तुकडे करून
मनुके ८-९
काजू ८-९
कृती :-
एका पातेल्यात दूध उकळून घ्या
चार चमचे कस्टर्ड पावडर व्हनिला
अर्धी वाटी दुधात विरघळवून घ्या
दुधात साखर घाला आणि विरघळलेली
कस्टर्ड पावडर त्या दुधात हळूहळूघालून
ढवळत रहा म्हणजे त्याच्या गाठी
होणार नाहीत आणि खाली करपणार नाही.
दहा मिनिटे शिजवून फ्रीज मध्ये थंड
करायला ठेवा आता ह्यात
सर्व प्रकारचे फळाचे तुकडे घालूनढवळा
आणि फ्रीज मध्ये थंड करायला ठेवा
उन्हाळ्यात थंडगार खा !!
पोटाचा दाह घालावा !!
Comments
Post a Comment