दही वडा.........
दही वडा............. |
साहित्य :
वाड्यासाठी : १ कप उडीद डाळ
मिरची पेस्ट
आले पेस्ट
चवीपुरते मीठ
तेल तळण्यासाठी
गोड दही : २-३ कप दही
चवीपुरती साखर
चवीपुरते मीठ
जिरे,मोहरी हिंग,कढीपत्ता यांची फोडणी(optional)
वरून भूरभूरायला मिरची पूड,चाट मसाला(optional)
बारीक चिरलेली कोथिंबीर सजवण्यासाठी
कृती :
१) उडीद डाळ ६ तास पाण्यात भिजवून नंतर रवाळ वाटून घेणे.वाटताना
जितके पाणी कमी वापरता येईल तितके कमीच वापरावे.
२) या पिठात मिरची,आले पेस्ट,मीठ घालून पीठ तयार करावे.(यात
सोडा घालण्याची गरज नाही.)
३) कढइ मध्ये तेल तापवून त्यात चमच्याने वडे टाकावेत व ते लालसर
तळून घ्यावेत.
४) एकीकडे दह्यात अगदी थोडे (१/२-१कप) पाणी घालून,साखर
मीठ,फोडणी घालून दही घोटून घ्यावे. हे दही ताकापेक्षा घट्ट
असावे.किंचित गोडसर असलेले दही वड्यामध्ये चवीला छान लागते.
५) तळलेले २-३ वडे पाण्यात बुडवून पिळून एका बाउल मध्ये
घ्यावेत.त्यावर दही घालावे.वरून मिरची पूड,चाट मसाला,कोथिंबीर
घालून सर्व करावे.
Comments
Post a Comment