रसगुल्ला..........
साहित्य -
१. गाईचे दुध
२. साखर
३. पाणी
४. व्हाईट व्हीनीगार
कृती :-
1) दुध गरम करायला ठेवा ,मधून मधून हलवत रहावे साई येणार नाही याची काळजी घ्या.
२) दुधाला उकळी आली की व्हीनीगार टाकून गॅस बारीक करा व चमच्याने ढवळावे म्हणजे दुध फाटेल .
३) नंतर चाळणी घ्या, चाळणीत मलमलचे फडके टाकून त्यात दुध ओतून अर्धा तास तसेच ठेवा. जेणेकरून त्यात असलेले पाणी निघून जाईल. पाणी पूर्ण निथळल्यावर फडक्यातून तयार पनीर बाहेर काढा. पनीर कुस्करून त्यातील पाणीमात्र निघणार नाही याची दक्षता घ्यावी
.
४) नंतर पनीर परातीत घेऊन तळहाताने व्यवस्थित मळून घ्यावे . मोठ्या पातेल्यात साखर पाणी घालून गॅसवर ठेवा आणि उकळी येईपर्यंत चमच्याने ढवळत राहा.
५) हे झाल्यावर पनीरचे गोल आकाराचे गोळे करून घ्यावेत. उकळलेल्या साखरेच्या पाण्यात पनीरचे गोळे एक एक करून सोडावेत किमान पाच मिनिटे गोळे पाकात उकळू द्यावेत. गॅस मोठा ठेवा.
६) नंतर पातेल्यावर झाकण ठेवून मोठ्या गॅससवर पाच मिनिटे गोळे परत उकळून , झाकण काढून मोठ्या गॅससवर परत २-३ मिनिटे उकळावेत. परत उकळताना त्यात गरजेनुसार थोडेसे पाणी टाकाव.
७) झाकण न ठेवता रसगुल्ले पूर्ण थंड होऊ द्यावेत.
Comments
Post a Comment