बेसन लाडू !!!!!!!!!!!!!!!
बेसन लाडू !!!!!!!!!!!!!!! |
साहित्य :-
दीड किलो बेसन पीठ
एक किलो डालडा
एक किलो पिठी साखर
इलायची जायफळ पूड १०० ग्राम
(१० इलायची एक जायफळ )
काजू १०० ग्राम
बदाम ५० ग्राम
मनुके ५० ग्राम
चारोळी ५० ग्राम
पिस्ते २० ग्राम
कृती :-
प्रथम पाऊण किलो बेसन पीठ
अर्ध्या किलो डालड्यात लालसर
खमंग भाजून घ्या नंतर दुसरे
पाऊण किलो पीठ अर्ध्या किलो
डालड्यात लालसर खमंग भाजून घ्या .
अर्धे अर्धे भाजल्यामुळे
पीठ भाजायला सोपे होते
सर्व ड्राय फ्रुट्स तुपात
लालसर हलके भाजून घ्या
मनुके शेवटी टाका म्हणजे
जळणार नाहीत पिठी साखर
चाळून घ्या व भाजलेल्या
बेसन पिठात इलायची जायफळ
पूड घालून मिसळून घ्या व
ह्याचे हातातला मुठीच्या
आकाराचे लाडू वळून घ्या
बेसन पीठ भाजणे हे एकच
कसब बेसन लाडू मध्ये आहे
ते आले कि लाडू छानच होतात
कच्चा सुका मेवा घालू नका !!
Comments
Post a Comment